दिलीप गोखले, श्रद्धान्जली
दिलीप म्हणजे चैतन्य, दिलीप म्हणजे न पकड़ता येणारे चैतन्य !
जर मोबाइल म्हणजे Connecting people तर दिलीप म्हणजे Connecting Good people !
आम्ही डोक्यात कल्पना आल्यावर, त्या कल्पनांवर मनातल्या मनात भरारी मारणारे तर दिलीप म्हणजे स्वत्याच्या डोक्यात किंवा दुसर्याच्या चांगल्या आमच्या सचोटीने आम्ही आम्ही आम्ही सचोटीने !
आम्ही सचोटीने आमच्या घरापुरते व्यवहार करणारे , तर दिलीप म्हणजे किरोल्स्कर Bros चा कित्येक कोटींचाव्यवहार प्रलोभानांवर मात करत, अत्यन्त सचोटीने करून , त्यांच्या प्रोजेक्टची परिपुर्तता करणारा व तेकिर्लोस्करांच्या ध्यानात येताच त्यांच्याकडून सन्माननीय अवार्ड मिळविणारा परिपूर्ण इलेक्ट्रिकल इंजिनियर!
आम्ही नुसते कागदावर आराखडा साकार करणारे इंजिनियर, तर दिलीप म्हणजे प्रत्यक्ष हाताने काम करून त्यातपारंगत होणारा व पुण्यात बसूनही निरानिराळया प्रकाल्पान्वर चालणा ऱ्या कामातील समस्या ऐकून त्यावर तोडगादेऊंन, इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष प्रकल्पावर जाऊन, त्या कार्यान्वयित करणारा प्रैक्टिकल इंजिनियर!
आम्ही दुसर्यांचे प्रोब्लेम्स ऐकून आपण काय करणार? म्हणून सोडून देणारे. तर दिलीप म्हणजे त्या समस्यांच्यामुळाशी जाऊन त्यात आपल्याला काय मदत करता येइल ते पाहणारा व ती मदत प्रत्यक्ष देणारा दिलदार दिलीप।
आम्ही चांगले स्वर ऐकूच आले, वा सहज म्हणून कानावर पडले तर अस्वाद घेणारे, तर दिलीप तू त्या स्वरान्वरस्वार होऊन लईला पकडणारा व त्या लईचा अभ्यास करून सतत रीयाज करून गाणार्याना वा वादाकाना साथकरणारा साथीदार. एकटा किंवा सोलो वादन करू शकणारा पण पुढे पुढे करण्याची हाव नसल्यामुळे ज्यांनालायाकारीची जाण आहे अशा गायकांनी सूचित केलेच तर त्याना साथ करणारा साथीदार !
आम्ही शास्त्रीय संगीताची कास धरणारे नुसतेच, तर दिलीप तू अनेक छूप्या व नवीन कलाकारांची कला चाखून, ती आमच्या सारख्या सामान्य श्रोत्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करून ऐकवणारा एक उत्तम आयोजक !
